व्हायरल-सत्य

Viral Satya : झाडावरच तयार होतात खुर्च्या ! (Video)

सकाळ वृत्तसेवा

खुर्ची बनवायची असेल तर झाड तोडावं लागतं. पण, इथे चक्क झाडावरच खुर्ची तयार होते. अशा प्रकारची आगळी वेगळी शेती केली जातेय. हे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. पण, खरं आहे. आता ही शेती बघा. डायरेक्ट रेडिमेंट खुर्ची तयार होईल अशीच झाडं लावण्यात आलीत. खुर्ची तयार करण्यासाठी झाड तयार झालं की मग खुर्चीसाठी हवा तेवढाच भाग तोडून खुर्ची बनवली जाते.

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या गेविन आणि एलिस मुनरो यांनी खुर्चीच्या झाडाची शेती केली. त्या शेतीत त्यांना यशही आलं आणि बघता बघता दोघांनी मिळून खुर्चीच्या झाडाची मोठी शेती केली. आजपर्यंत दोघांनी मिळून 400 पेक्षा जास्त खुर्च्या तयार केल्या आहेत. इतकंच नव्हे तर ही खुर्ची आगळीवेगळी असल्यानं तिला मार्केटमध्ये लाखो रुपयांत किंमत मिळतेय.

खुर्चीच झाड लावताना खुर्ची तयार होईल असा वेलींना आकार दिला जातो. त्या आकारामध्ये झाड मोठं झालं की खुर्चीसारखचं तयार होतं. त्यामुळं खुर्ची तयार करण्यासाठी फायदा होतो. खुर्चीसाठी हवं तेवढं झाड तोडून त्याला खुर्चीचा आकार देऊन फिनिशिंग केलं जातं. आरामदायी खुर्ची तयार होत असून, मोठ्या प्रमाणात खुर्चीला मागणी आहे. त्यामुळं या खुर्चीच्या झाडाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

***************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT