व्हायरल-सत्य

Viral Satya : ओसाड पडलेलं गाव बनलं पर्यटनस्थळ (Video)

सकाळ वृत्तसेवा

स्वच्छ सुंदर तळं पाहून त्यामध्ये पोहायला कुणाला आवडणार नाही. इथे आल्यावर प्रत्येकजण पाण्यात उतरून सेल्फी काढल्याशिवाय जात नाही. ज्या गावाची ओळख ओसाड गाव म्हणून होती, या गावात येण्याजाण्यासाठीही वाहतूक नव्हती तेच गाव आता पर्यटनस्थळ बनलंय. इथे आल्यावर पाण्यात सेल्फी काढण्याची सोय करण्यात आलीय...पाण्यात जुन्या वस्तू ठेवण्यात आल्यायत. त्यावर बसून आपण पाण्यात सेल्फी काढू शकतो. पाण्यात पोहतानाचे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोही काढण्याची सोय करण्यात आलीय. त्यामुळं मोठ्या प्रमाणात या तळ्यात पोहण्यासाठी आणि सेल्फीसाठी पर्यटक येत असतात.

हे पर्यटनस्थळ इंडोनेशियातील अंबेल पोंगोक गावातील आहे. 15 वर्षांपूर्वी अंबेल पोंगोक गाव ओसाड होतं. कुणालाही रोजगार मिळत नव्हता. पण, गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गाव समुद्ध बनवलं. आज हेच गाव इंडोनेशियातील टॉप 10 समृद्ध गावांच्या यादीत आहे. वर्षाकाठी केवळ 4 लाख रुपये वार्षिक उत्पन्न कमावणारं हे गाव आता वर्षाला 7 कोटी रुपये कमावतंय.

या गावातील प्रत्येक कुटुंब अंडर वॉटर सेल्फी स्पॉटच्या माध्यमातून महिन्याला चांगली रक्कम कमावतोय. या गावातील तलावाचे खास इंस्टाग्राम अकाऊंट असून त्याला 40 हजार फॉलोवर्स आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनं पर्यटक इंडोनेशियातील अंबेल पोंगोक गावाला भेट देतात. तुम्हालाही या तळ्यात जाऊन सेल्फी काढायचा असेल तर इंडोनेशियात जावं लागेल.

***************************************************************

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT