व्हायरल-सत्य

Viral Satya : पुण्यात रात्रीच्या अंधारात मुलीला भुतानं झपाटलं? (Video)

सकाळ वृत्तसेवा

काही दिवसांपासून सोशल मीडियावर या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ही मुलगी कोण आहे? हे माहित नाही. पण, या मुलीला भुताने झपाटल्याचा दावा केला जातोय. पुण्यातील भोसरी सखुबाई गवळी उद्यानात दांडीया संपल्यानंतर या मुलीला अचानकच भुताने झपाटल्याचा दावा केलाय. अशा आशयाचा मेसेज आणि पुरावा म्हणून हा व्हायरल केला जातोय. पण, जगात खरंच भूत कुणाला दिसलंय का? या मुलीला नक्की काय झालंय. याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मुलगी जोरजोरात ओरडत असल्याचं ऐकायला मिळतंय. तर उलट दिशेने धावताना जमिनीवर कोसळते. काही लोक तिला पकडण्याचा प्रयत्न करतायत. पण, ही मुलगी असं का वागतेय? तिला भुतानं झपाटलंय की मानसिक आजार जडलाय? माणसाला भूत झपाटतं का? याबद्दल अधिक माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यवाहकांकडून जाणून घेतली.

या जगात भूत वगैरे कुणीही नसल्याचं मत अनिसच्या कार्यवाहकांनी व्यक्त केलंय .या मुलीला मानसिक आजार जडला असावा असंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.

अशा प्रकारे भूत अंगात येणे शक्य नाही
मुलीला मानसिक आजार झाला असावा
भुतानं झपाटलं नसून अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका

भूतप्रेत या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अशा अंधश्रद्धेला बळी पडू नका. या मुलीला भूतानं झपाटलं नसून, तिला मानसिक आजार झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळं असे व्हिडीओ व्हायरल करून लोकांमध्ये चुकीचा मेसेज पसरवू नका.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT