Viral satya video Woman climbs into lion exhibit at NYC zoo 
व्हायरल-सत्य

Viral Satya : हिंस्त्र सिंहाशी महिलेची मस्ती ! (Video)

सकाळ वृत्तसेवा

सिंह दिसला तर त्याच्यासमोर जाण्याची कुणाची हिंमतही होणार नाही. पण, या महिलेची हिंमत बघा. सिंहासमोर जाण्याचं हिनं धाडस केलंय. ही महिला प्राणी संग्रहालयात फिरत होती. अचानक हिला काय झालं माहित नाही. सिंह दिसताच तिनं सिंहाच्या समोर जाण्याचा प्रयत्न केला. सिंहही तिच्या दिशेनं येत होता. तरीदेखील ती मागे फिरली नाही. सिंहासमोर उभी राहिली. सगळेजण ओरडून तिला मागे ये असं सांगत होते. पण, ही ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. सिंहाच्या समोर उभी राहून सिंहाला डिवचत होती. बघा, ही काय करतेय. लहान मुलांना आपण वेडावून दाखवतो तशीच ही सिंहाला वेडावून दाखवतेय.

सिंहानं कधीही हिच्यावर हल्ला केला असता. पण, ही मागे फिरली नाही. सिंहाला डिवचत राहिली. जोरजोरात ओरडत राहिली. त्यामुळं सिंह हा सगळा प्रकार पाहातच राहिला...हिचं नशीब बलवत्तर म्हणून सिंहानं हल्ला केला नाही. नाहीतर सिंहाशी अशी मस्ती करणं हिच्या जीवावर बेतलं असतं. थोड्या वेळानं सिंहच इथून निघून गेला आणि मोठ्या संकटातून ही महिला वाचली.

हा सगळा प्रकार अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या ब्रॉन्स झूमध्ये घडलाय. मस्ती करत असताना ही महिला अचानक सिंहाच्या समोर गेली. पण, सिंह समोर आल्यानं हिची चांगलीच पंचाईत झाली. मात्र, मोठ्या नशीबानं ही सुखरुप सुटलीय. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण, तुम्ही असं धाडसं करू नका.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT