व्हायरल-सत्य

Viral Satya : एलआयसीमधले पैसे बुडणार? (Video)

सकाळ वृत्तसेवा

आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून आपण सरकारी बँका, विमा कंपनीत पैसे गुंतवतो. सरकारी विमा पॉलिसी म्हणून एलआयसीमध्ये पैसे ठेवतो. पण, एलआयसीमधील पैसे आता बुडणार असा मेसेज व्हायरल होतोय. आपल्या हक्काचे पैसे बुडणार म्हटल्यावर गुंतवणूकदार चिंतेत आहेत. खरंच एलआयसी दिवाळखोरीत आहे का? एलआयसीला मंदीचा फटका बसल्याचंही मेसेजमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं प्रयत्न केला.

एलआयसीने काही हजार कोटींचा पैसा अनेक कंपन्यांमध्ये गुंतवला त्या कंपन्यांचा शेअर गुंतवणूक किंमतीपेक्षा कमी आहे. देशाची सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसी तोट्यात असल्याने लाखो पॉलिसीधारकांचे पैसे असुरक्षित आहेत. हा मेसेज व्हायरल झाल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबद्दल अधिक माहिती एलआयसीचे अधिकारी देऊ शकतील. त्यामुळं एलआयसी अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आमचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवून खरंच एलआयसीमधील पैसे बुडणार का याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण, एलआयसी आर्थिक संकटात नसल्याचं सांगून कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. 

एलआयसीमधील गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत
एलआयसी तोट्यात नसून, कुणाचेही पैसे बुडणार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं
लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय
व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका 

2018-19 या आर्थिक वर्षात पॉलिसीधारकांना एलआयसीने आतापर्यंतचा सर्वाधिक 50000 कोटींचा बोनस दिलाय. एलआयसीचा मार्केट शेअर मार्चमधील 66.24 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 73.06 टक्क्यांवर गेला होता. यावरूनच एलआयसी तोट्यात नसल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत एलआयसीमधील पैसे बुडणार हा दावा असत्य ठरला.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लेन पूर्ण बंद, पुणे मार्गावर १२ किमी वाहनांच्या रांगा; उलटलेल्या टँकरमधून गॅस गळती वाढली

Pankaja Munde: बाबासाहेबांना अभिवादन नाही… अन् गाव आक्रमक! पंकजा मुंडेंना ग्रामस्थांनी रोखलं, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’ची भाजपला धक्का देण्याची तयारी; राजकारणात सगळं शक्य, इम्तियाज जलील यांचा इशारा!

मुंबई एक्सप्रेसवे वाहतूक ठप्पच, पर्यायी मार्ग वापरा; प्रवासाला ४-५ तास जास्त लागू शकतात, ट्राफिक पोलिसांचे आवाहन

SCROLL FOR NEXT