Farmers friends the frogs will disappear 
व्हायरल-सत्य

Viral Satya : शेतकऱ्यांचा मित्र गायब होणार? (Video)

सकाळ वृत्तसेवा

शेताच्या पिकातील धोकादायक कीटकांचा फडशा पाडणारा शेतकऱ्यांचा मित्र बेडूक नाहीसा होतोय. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणाऱ्या बेडकांची संख्या कमी होतेय. पिकांवर घातक रसायनांनी युक्त किटकनाशके फवारण्याचे प्रमाण वाढलंय. यामुळंच शेतकऱ्यांचा मित्र आता संकटात सापडलाय. काही बेडकांच्या अनेक प्रजाती कमी झाल्यायत. 

उभयचर प्राण्यांमध्ये समाविष्ट असलेला बेडूक विलक्षण आहे. अनेक बेडूक प्रजाती जमिनीत खोल निद्रावस्तेत जातात आणि पावसाळ्याची चाहूल लागताच प्रजननासाठी बाहेर येतात. त्यामुळं प्रजनन काळात म्हणजे पावसाळ्यात बेडकांची डराव डराव ऐकू येते. पण, आता ही डराव डराव धोक्यात आलीय. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर या संस्थेनं जगातील उभयचर प्राण्यांचे सर्वेक्षण केलं. यात 32 टक्के प्राणी नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात आलंय. 

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...
- शेतकरी कीटकनाशक फवारत असल्याने बेडूक मरत आहेत
- कीटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं शेतीचं नुकसान होत
- बेडूक मोठ्या प्रमाणात कीटक खाऊन शेतकऱ्यांची मदत करतो
- कीटक मारण्यासाठी शेतकरी अधिक जहाल कीटकनाशक फवारत आहे

त्यामुळं शेतीत फवारणीचं प्रमाण वाढल्याने शेतकऱ्याचा मित्र बेडूक मरत आहेत. आमच्या पडताळणीत डराव डराव धोक्यात असून, बेडकांची संख्या कमी होत असल्याचा दावा सत्य ठरला.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

Latest Marathi News Live Update : जळगाव सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT