Viral Satya Video Thousands of larvae terror in Mumbai 
व्हायरल-सत्य

Viral Satya : रहस्यमय किड्यांची मुंबई दहशत (Video)

सकाळ वृत्तसेवा

अजब किड्यांनी रस्त्यावरच थैमान घातलंय. बघावं तिकडे किडेच किडे दिसतायत. झाडावर, रस्त्यावर, सोसायटीच्या भिंतीवर किडे लटकत असलेले दिसतायत. पण, हे किडे आहेत तरी कोणते? अचानक एवढे किडे आले तरी कुठून हाच प्रश्न नवी मुंबईकरांना पडलाय. किडा अंगावर पडला तर शरीराला खाज सुटते त्यामुळं भीतीचं वातावरण पसरलंय.

हे किडे सीवूड परिसरातील रस्त्यावरून आता सोसायटीच्या संरक्षण भिंत, झाडंही किड्यांनी व्यापलीय. रोडवरून जाणा-या पादचा-यांच्या अंगावर किडे पडतात. झाडावरून खाली जाळ्यामध्ये किडे लोंबकळत असल्याने बाईकचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली. पण, हे किडे आहेत तरी कोणते याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

अजब किड्यांचं रहस्य !
या किड्याला टीक कॅटर पीलर किंवा टीक डीफोलेटर असं म्हणतात
सागाच्या झाडावर हे किडे आढळतात,सागाची पानं खाऊन किडे जगतात
जून ते सप्टेंबर महिन्यात किड्यांचा प्रजननाचा काळ असतो
हे किडे चावल्याने अंगाला खाज सुटते

प्रजनन काळात हे किडे हजारो अंडी देतात त्यामुळं हजारो संख्येनं किडे आढळतात. मुंबई, ठाण्यासारख्या पश्चिम किनाऱ्यावरील परिसरात हे किडे जास्त प्रमाणात आढळून येतात. हा किडा चावल्यास अंगाला खाज सुटते. त्यामुळं या किड्याला हात लावू नका.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT